November 29, 2024 3:49 PM

views 27

ईव्हीएम विरोधात काँग्रेसने केलेले आरोप हास्यास्पद – मंत्री सुधीर मुनगंटीवार

ईव्हीएम विरोधात काँग्रेसने केलेले आरोप हास्यास्पद असल्याची टीका भाजपाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. देशभरात ईव्हीएमवर निवडणुका घेण्याचा निर्णय आणि ईव्हीएमची खरेदी काँग्रेसच्या कार्यकाळात करण्यात आली होती. तसंच आंदोलनाचा इशारा देण्यापूर्वी, देशभरात विवि...

November 29, 2024 3:44 PM

views 21

देशातल्या प्रसिद्ध पर्यटन स्थळांच्या विकासासाठी ३ हजार ३०० कोटींच्या ४० योजनांना केंद्राची मंजुरी

केंद्र सरकारने देशातल्या प्रसिद्ध पर्यटन स्थळांना जागतिक मानकांनुसार विकसित करण्यासाठी सुमारे तीन हजार ३०० कोटी रुपयांच्या ४० योजनांना मंजुरी दिली आहे. २३ राज्यातल्या या योजनांसाठी राज्यांना विशेष मदत दिली जाईल, ज्यावर, पुढची ५० वर्षं कोणतंही व्याज आकारलं जाणार नाही.   यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्...

November 29, 2024 3:41 PM

views 30

राज्यात थंडीचा कडाका सुरू

राज्यात थंडीची कडाका वाढत असून बऱ्याचं ठिकाणी तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. परभणी जिल्ह्यात आज सर्वाधिक कमी ८ अंंश सेल्सिअस तापमानाची नोंद, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या हवामान विभागानं केली आहे.   अमरावती शहरात देखील पारा १२ अंश सेल्सिअस पर्यंत तर धारणी-चिखलदऱ्यात पहाटे पार...

November 29, 2024 6:49 PM

views 33

गोंदिया जिल्ह्यात बस अपघातात ११ जण ठार, मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी १० लाख अर्थसहाय्य देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

गोंदिया जिल्ह्यात आज सकाळी एस टीच्या शिवशाही बसला अपघात होऊन ११ जणांचा मृत्यू झाला तर ३३ जण जखमी झाले. ही बस भंडाऱ्याहून गोंदियाकडे चालली होती. वाटेत सडक अर्जुनी मार्गावर बिंद्रावन टोला या गावानजीक चालकाचं नियंत्रण सुटल्याने बस उलटून हा अपघात झाला. पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने धाव घेत बचाव कार्य सुर...

November 29, 2024 1:41 PM

views 35

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेबाबत महायुतीच्या प्रमुख नेत्यांची नवी दिल्लीत अमित शहा यांच्यासमवेत बैठक

महाराष्ट्रातल्या सत्तास्थापनेबाबत चर्चा करण्यासाठी काल रात्री मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे, भाजपा नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा देखील यावेळी उपस्थित होते. भाजपाचं व...

November 29, 2024 1:31 PM

views 18

इस्रायलचा दक्षिण लेबनॉनमधल्या हिजबुल्लाहच्या क्षेपणास्त्र तळावर हल्ला

इस्रायलच्या हवाई दलाने काल दक्षिण लेबनॉनमधल्या हिजबुल्लाहच्या क्षेपणास्त्र तळावर हल्ला केला. हिजबुल्लाहबरोबरच्या बुधवारी लागू झालेल्या युद्धविरामाचे हे उल्लंघन आहे, असं लेबनॉनने म्हटलं आहे.  बुधवारी आणि गुरुवारी इस्रायलने अनेकदा युद्धविरामाचे उल्लंघन केल्याचा आरोपही लेबनॉनने केला आहे. अमेरिका आणि फ्...

November 29, 2024 1:21 PM

views 27

आम आदमी पक्षाच्या खासदारांचं संसदेबाहेर निदर्शन

दिल्लीत गुन्हेगारीच्या घटना वाढत असल्याचा आरोप करत आम आदमी पक्षाच्या खासदारांनी आज संसदेबाहेर निदर्शनं केली. दिल्लीत वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी सरकारच्या उपाययोजना कराव्यात असं पक्षाचे नेते संजय सिंह यांनी यावेळी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.     तसंच पंजाबमधल्या काँग्रेस खासदारांनीही आज संस...

November 29, 2024 1:07 PM

views 21

संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आजही दिवसभरासाठी तहकूब

अदानी लाच प्रकरणासह इतर मुद्यांबाबत विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळं संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजात आजही अडथळे निर्माण झाले. त्यामुळं संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज आज चौथ्या दिवशी देखील दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.    आज सकाळी राज्यसभेचं कामकाज सुरु होताच विरोधी पक्षाच्या सदस्...

November 29, 2024 2:45 PM

views 14

इस्कॉनवर बंदी घालण्याबाबत कोणतीही चर्चा नाही – बांगलादेश सरकार

इस्कॉन संस्थेवर बंदी घालण्याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झाली नसल्याचं बांग्लादेच्या सरकारनं स्पष्ट केलं आहे. बांग्लादेशाच्या हंगामी सरकारचे पर्यावरण, वन आणि हवामान सल्लागार सैय्यद रिजवाना यांनी काल बातमीदारांशी बोलताना याबाबत खुलासा केला. बांग्लादेशातल्या हिंदू समाजाचे नेते चिन्मय कृष्णदास यांना एका व...

November 29, 2024 1:22 PM

views 30

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवसांच्या ओडिशा दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवसांच्या ओडिशा दौऱ्यावर आहेत. भुवनेश्वर इथं होत असलेल्या पोलिस महासंचालक आणि पोलिस महानिरीक्षकांच्या अखिल भारतीय परिषदेला ते उपस्थित राहणार आहेत. ओडिशा प्रथमच या कार्यक्रमाचं आयोजन करत आहे. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे पोलीस महासंचालक, तसंच केंद्रीय र...