December 4, 2024 7:57 PM

views 26

इस्त्रोच्या पीएसएल व्हीसी ५९ प्रक्षेपकाचं उड्डाण लांबणीवर

इस्त्रोच्या पीएसएल व्हीसी ५९ प्रक्षेपकाचं उड्डाण लांबणीवर पडलं असून आता उद्या हा प्रक्षेपक अंतराळात झेपावेल, असं इसरोनं समाजमाध्यमावर जाहीर केलं आहे. प्रोबा ३ हे युरोपीय उपग्रह उद्या संध्याकाळी चार वाजून १२ मिनिटांनी प्रक्षेपित केले जातील.

December 4, 2024 7:55 PM

views 45

महिलांच्या सहकारी संस्थांच्या विकासासाठी ७,७०८ कोटी रुपयांहून अधिक अर्थसाहाय्य मंजूर

राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने महिलांचा सहभाग असलेल्या सहकारी संस्थांच्या विकासासाठी ७ हजार ७०८ कोटी रुपयांहून अधिक अर्थसाहाय्य मंजूर केलं आहे. राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी ही माहिती दिली. देशात २५ हजार ३८५ महिला कल्याणकारी सहकारी संस्था नोंदणीकृत आह...

December 4, 2024 7:24 PM

views 23

सिंधुदुर्गात बेकायदा मद्य वाहतूक प्रकरणी कारवाई

सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाराप इथं बेकायदा मद्य वाहतूक प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं दोघांना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याकडून ६१ लाख २८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे ही कारवाई क...

December 4, 2024 8:21 PM

views 32

पुरुषांच्या हॉकी ज्युनियर आशिया चषक स्पर्धेच्या विजेतपदासाठी भारताची पाकिस्तानशी लढत

ओमान इथं सुरू असलेल्या पुरुषांच्या हॉकी ज्युनियर आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री साडे आठ वाजता सुरू होईल. काल या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतीय संघानं मलेशियाला ३-१ ने नमवत अंतिम फेरी गाठली होती. तर पाकिस्तानी संघानं जप...

December 4, 2024 7:07 PM

views 18

राज्यसभेत बॉयलर दुरुस्ती विधेयक २०२४ मंजूर

बॉयलर संदर्भातल्या शंभर वर्षं जुना कायदा रद्द करून, बॉयलर दुरुस्ती विधेयक, २०२४ आज राज्यसभेत मंजूर झालं. या विधेयकाच्या मंजुरीनंतर केंद्र सरकार केंद्रीय बॉयलर मंडळाची स्थापन करू शकणार आहे, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज राज्यसभेत दिली. या विधेयकात बॉयलरमध्ये काम कर...

December 4, 2024 7:31 PM

views 22

महायुतीचा राज्यपालांकडे सत्तास्थापनेसाठी दावा

महायुतीच्या नेत्यांनी आज राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. यावेळी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडनवीस, अजित पवार, आणि इतर नेत्यांनी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या एकूण २३७ आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र राज्यपालांना दिलं. याव...

December 4, 2024 8:18 PM

views 28

नवं सरकार राज्याच्या प्रगतीसाठी काम करेल – देवेंद्र फडणवीस

महायुतीचे प्रमुख नेते देवेंद्र फडनवीस, एकनाथ शिंदे  आणि अजित  पवार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याची माहिती दिली. महायुतीत  आतापर्यंत सर्व निर्णय एकत्रितपणे घेतले गेले असून यापुढेही एकत्र राहून निर्णय घेऊ असं भाजपा विधिमंडळ गट नेते देवेंद्र फडनवीस यांनी यावेळी सांग...

December 4, 2024 3:08 PM

views 35

चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात भुकंपाचे तीव्र धक्के

महाराष्ट्रात चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात आज सकाळी साडे सातच्या सुमारास भुकंपाचे तीव्र धक्के जाणवले. भुकंपाची तीव्रता ५ पूर्णांक ३ दशांश रिक्टर स्केल असल्याचं राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने जाहीर केलं आहे. तेलंगणा राज्यातील मुलुगु या भुकंपाचा केंद्रबिंदू होता, गोदीवरी नदीच्या खोऱ्यात भुकंपाचे ध...

December 4, 2024 2:28 PM

views 13

इस्त्राईलने हिजबुल्लासोबत युद्धविराम संपुष्टात आल्यास हल्ले वाढवण्याचा दिला इशारा

हिजबुल्लाह बरोबरचा युद्धविराम संपुष्टात आला तर इस्राईल लेबनॉनला लक्ष्य करण्यासाठी हल्ले वाढवेल, असा इशारा इस्राईलनं दिला आहे. इस्राईलनं युद्धबंदीचं उल्लंघन केल्याचा आरोप करत हिजबुल्लाहनं विवादित सीमाभागात सोमवारी दोन मोर्टार डागल्यानंतर त्याला प्रत्युत्तर देत इस्राईलनं हा इशारा दिला आहे. दरम्यान, यु...

December 4, 2024 2:26 PM

views 13

जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या डी. गुकेश चा सामना चीनच्या डिंग लायरेन याच्याशी होणार

सिंगापूर इथे सुरू असलेल्या जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या डी. गुकेश याचा सामना आज दुपारी चीनच्या डिंग लायरेन याच्याशी होणार आहे. दुपारी २ वाजून २० मिनिटांनी हा सामना सुरू होईल. ही या स्पर्धेची आठवी फेरी आहे. काल गुकेश आणि डिंग यांच्यात झालेला सातव्या फेरीचा सामना बरोबरीत सुटला होता.