December 6, 2025 3:20 PM December 6, 2025 3:20 PM
पालघर जिल्ह्यात ९ टन प्लास्टिक जप्त
पालघर जिल्ह्यातल्या एका गोदामातून सुमारे ९ टन बंदी घातलेलं प्लास्टिक जप्त केल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे. वसई विरार महापालिकेनं आजवर केलेली ही सर्वात मोठी जप्ती आहे. गोदाम मालकाला ५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.