येत्या १८ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या बक्षिसाच्या रकमेत वाढ करण्यात आल्याचं स्पर्धेच्या आयोजकांनी आज घोषित केलं. त्यानुसार २०२६ च्या हंगामातल्या पहिल्याच स्पर्धेत बक्षिसाची रक्कम ११ कोटी १५ लाख ऑस्ट्रेलियन डॉलर्स इतकी असेल.
पात्रता स्पर्धेच्या बक्षिस रकमेत १६% वाढ होईल, तसंच सर्व प्रमुख एकेरी आणि दुहेरी सामन्यांच्या खेळाडूंना मिळणाऱ्या बक्षिसाच्या रकमेत कमीतकमी १० टक्के वाढ होईल, असं यात म्हटलं आहे.