डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस : पुरुष एकेरीच्या विजेतपदासाठी गतविजेता यानिक सिनर आणि जर्मनीचा अलेक्झांडर झ्वेरेव्ह यांची लढत

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत आज पुरुष एकेरीचा अंतिम सामना अग्रमानांकित आणि गतविजेता यानिक सिनर आणि जर्मनीचा अलेक्झांडर झ्वेरेव्ह यांच्यात होणार आहे. 

महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात काल अमेरिकेच्या मॅडिनस कीज हिनं अग्रमानांकित अरीना साबालेंका हिला धक्का देत अजिंक्यपद पटकावलं. तिनं साबालेंकावर ६-३, २-६, ७-५ अशी मात केली. दुसरीकडे महिला दुहेरीत टेलर टाऊनसेंड आणि कॅटरीना सिनियाकोव्हा यांच्या जोडीनं सु वे शे आणि येलेना ऑस्टापेंको यांच्यावर ६-२, ६-७, ६-३ असा विजय मिळवला आणि जेतेपद पटकावलं.