ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे आयुष शेट्टी आणि लक्ष्य सेन यांनी उपांत्यपूर्व धडक मारली आहे. भारताच्याच सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनेही चायनीज तैपईच्या सु-चींग हेंग आणि वू-गुआन शून यांचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवलं आहे. उपांत्यपूर्व फेरीत सात्विक आणि चिराग या जोडीचा सामना इंडोनेशियाच्या जर अलफियान आणि मुहम्मद शोहिबुल फिकरी यांच्याशी होणार आहे. तर आयुष्यशेट्टीचा सामना लक्ष्य सेनशी होणार आहे. एच एस प्रणोय आणि किदंबी श्रीकांत हे या स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.
Site Admin | November 20, 2025 8:08 PM
ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आयुष शेट्टी, लक्ष्य सेनची उपांत्यपूर्व फेरीत धडक