भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटात उपान्त्य फेरीत पोहोचला आहे. उपान्त्यपूर्व फेरीत त्याने भारताच्याच आयुष शेट्टीचा २३-२१, २१-११ असा पराभव केला. उपान्त्य फेरीत लक्ष्यचा सामना चिनी तैपेईचा चाऊ-तिएन-चेन बरोबर होईल. जागतिक क्रमवारीत चाऊ दुसऱ्या तर लक्ष्य सेन सातव्या स्थानावर आहे.
पुरुष दुहेरीतली अग्रमानांकित जोडी सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना उपान्त्यपूर्व फेरीत इंडोनेशियाच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला.
एच. एस. प्रणॉय आणि किदांबी श्रीकांत देखील स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.