ऑस्ट्रेलियात १६ वर्षांखालच्या मुलांना समाजमाध्यम वापरावर बंदी लागू झाली आहे. ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांनी यंदा सप्टेंबर महिन्यात या बंदीविषयीची घोषणा केली होती. हा नियम आजपासून लागू झाला. आता या मुलांना फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्युब, थ्रेड्स, एक्स, स्नॅपचॅट, किक, रेडीट, टिकटॉक ही माध्यमं वापरता येणार नाहीत.
माहितीचा अतिरेकी वापर रोखणं, मानसिक ताण, एकटेपणा आणि अतिवापरामुळे होणाऱ्या नकारात्मक परिणामांपासून मुलांचं संरक्षण व्हावं या उद्देशाने ही बंदी घालण्यात आली आहे. नियमांचा भंग केल्यास संबंधित समाज माध्यम चालवणाऱ्या कंपन्यांवर ३ कोटी २० लाख डॉलर्सचा दंड आकारण्यात येणार आहे.