डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

November 17, 2024 5:22 PM | Indo-Pacific region

printer

इंडो-पॅसिफिक प्रदेशात सागरी क्षेत्रात निगराणी ठेवायला भारताला मदत करण्यासाठी ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका वचनबद्ध

इंडो-पॅसिफिक प्रदेशात सागरी क्षेत्रात निगराणी ठेवायला भारताला मदत करण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत असं ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेने आज स्पष्ट केलं. ऑस्ट्रेलियामधल्या डार्विन इथं ऑस्ट्रेलियाचे उपप्रधानमंत्री रिचर्ड मार्ल्स, जपानचे संरक्षण मंत्री नाकातनी जेन आणि अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉईड ऑस्टिन यांच्या उपस्थितीत संरक्षण मंत्र्यांची बैठक झाली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. सागरी निगराणीतील भारताच्या नेतृत्वाचंही तिन्ही मंत्र्यांनी यावेळी कौतुक केलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.