ऑस्ट्रेलियातल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री एँथनी अल्बानीज यांनी त्यांचे विरोधक पीटर डटन यांच्या मतदारसंघात जाऊन प्रचारसभा घेतली. या निवडणुकीत लेबर पार्टी सत्ता कायम ठेवण्यात यशस्वी होईल असं काही जनमत चाचण्यांमधून दिसून आलं आहे. महागाई, घरांच्या वाढत्या किमती हे या निवडणुकीतले मुद्दे होते, मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आकारलेल्या आयात शुल्काचा मुद्दाही या निवडणुकीत प्रमुख मुद्दा असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात. तर काही विश्लेषकांच्या मते ट्रम्प यांचा मुद्दा निवडणुकीत महत्त्वाचा नव्हता, मात्र अल्बेनिज यांच्या जोरदार प्रचारामुळे त्यांचं पारडं जड झालं आहे.
Site Admin | May 2, 2025 1:37 PM | Australia Election:
ऑस्ट्रेलियातल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात
