भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघांमधला ५० षटकांचा तिसरा आणि निर्णायक सामना काल ऑस्ट्रेलियानं ४३ धावांनी जिंकला. तीन सामन्यांच्या या मालिकेतही ऑस्ट्रेलियाच्या महिला संघानं २-१ असा विजय मिळवला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या महिला संघानं ४८ षटकांत सर्व गडी बाद ४१२ धावा केल्या. विजयासाठी ४१३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय महिला संघाचे सर्व फलंदाज ३६९ धावांवर बाद झाले.