डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

ब्रिस्बेन येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाचा भारतावर विजय

भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघांमध्ये आज ब्रिस्बेन इथं झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारतावर १२२ धावांनी विजय मिळवला. या विजयासोबत ऑस्ट्रिलेयानं तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.
या सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर जॉर्जिया आणि एलिसे यांच्या शतकी खेळींच्या जोरावर निर्धारीत ५० षटकांत ८ बाद ३७१ धावा केल्या. विजयासाठी ३७२ धावांचा पाठलाग करताना भारताचा संपूर्ण संघ ४४ षटकं आणि ५ चेंडूंमध्ये २४९ धावा करून माघारी परतला. भारताच्या वतीनं सलामीला आलेल्या रिचा घोष हीनं सर्वाधिक ५४ धावा केल्या, तर ऑस्ट्रेलियाच्या ॲनाबेल हीनं भारताच्या चार खेळाडूंना बाद केलं.
मालिकेतला तिसरा आणि अखेरचा सामना येत्या ११ डिसेंबरला पर्थ इथं होणार आहे

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.