क्रिकेटमध्ये, पर्थ इथं भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं काल भारतावर ७ गडी राखून मात केली. पावसाच्या व्यत्ययामुळं सामना चार वेळा थांबवण्यात आला. वेळ कमी पडल्यामुळे सामना २६ षटकांपर्यंत मर्यादित करण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं २६ षटकांत ९ बाद १३६ धावा केल्या. डकवर्थ-लुईस नियमानुसार ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी १३१ धावांचं लक्ष्य होतं. ते त्यांनी २२व्या षटकांत ३ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. या विजयामुळं तीन सामन्यांच्या या मालिकेत ऑस्ट्रेलियानं १-० अशी आघाडी घेतली आहे.
Site Admin | October 20, 2025 12:55 PM | Australia | Cricket | India
ऑस्ट्रेलियाची भारतावर ७ गडी राखून मात