भारताच्या ७९व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने होणारा राज्यातला मुख्य शासकीय सोहळा १५ ऑगस्ट रोजी मुंबई इथे मंत्रालयात होणार आहे. सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल. पुणे इथे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. ठाणे इथे जिल्हा मुख्यालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तर बीड इथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. नाशिक इथे राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते तर रायगड जिल्ह्यात राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.
Site Admin | August 11, 2025 7:06 PM | August 15 | Mantralaya
राज्यातला मुख्य शासकीय सोहळा १५ ऑगस्ट रोजी मुंबईत मंत्रालयात होणार
