इस्राएलच्या लष्कराने गाझा शहर आणि परिसरात कालही हल्ले
इस्राएलच्या लष्कराने गाझा शहर आणि परिसरात कालही हल्ले सुरूच ठेवले. त्यात आतापर्यंत किमान ६० पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. इस्राएलच्या लष्कराने केलेल्या हल्ल्यांत गेल्या दोन आठवड्यात २० उंच इमारती पडल्या आहेत. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून ५ लाख गाझा वासी विस्थापित झाले असल्याचं वृत्त इस्रायली माध्यमांनी दिलं आहे.
ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, ब्रिटन आणि कॅनडा सहित १० देश उद्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेच्या वार्षिक अधिवेशनापूर्वी स्वतंत्र पॅलेस्टाईन देशाला मान्यता देणार आहेत. या पार्श्वभूमीवर इस्राएल हल्ले करत आहे. इस्राएलच्या हल्ल्यांत गेल्या दोन आठवड्यात २० उंच इमारती पडल्या आहेत. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून ५ लाख लोकांनी गाझा शहरातून पलायन केलं असल्याचं वृत्त इस्रायली माध्यमांनी दिलं आहे.
Site Admin | September 21, 2025 2:48 PM | israel gaza attac
इस्राएलच्या लष्कराने गाझा शहर आणि परिसरात झालेल्या हल्ल्यात आतापर्यंत ६० पॅलेस्टिनींचा मृत्यू