आम आदमी पार्टीच्या नेत्या आतिशी मार्लेना दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री

आम आदमी पार्टीच्या नेत्या आतिशी दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री असतील. त्यांची काल दिल्ली विधानसभेत पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली. त्यानंतर त्यांनी नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांची भेट घेतली. तत्पूर्वी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नायब राज्यपालांना भेटून राजीनामा सादर केला.