प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज राष्ट्र प्रेरणा स्थळाचं उद्घाटन

माजी प्रधानमंत्री भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या 101व्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज लखनौला भेट देणार आहेत. दुपारी 2:30 वाजता, मोदी यांच्या हस्ते राष्ट्र प्रेरणा स्थळाचं उद्घाटन होणार असून, त्यानंतर ते तिथल्या जनसभेला संबोधित करतील. स्वतंत्र भारतातील महान व्यक्तिमत्त्वांच्या वारशाला सन्मान देण्याचा पंतप्रधान मोदी यांचा हा संकल्प आहे. देशाच्या लोकशाही, राजकीय क्षेत्र आणि देशाच्या विकासात खोल प्रभाव पाडणाऱ्या महान नेत्यांच्या जीवन आणि आदर्शांप्रती ही श्रद्धांजली आहे. राष्ट्र प्रेरणा स्थळ हे एक प्रमुख राष्ट्रीय स्मारक आणि प्रेरणादायी परिसर म्हणून विकसित करण्यात आलं आहे. सुमारे 65 एकर परिसरात ते 230 कोटींच्या निधीतून बांधण्यात आलं आहे.