डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

अमेरिकेत टेक्सास राज्यात आलेल्या भीषण पुरामुळे आतापर्यंत किमान ४९ जणांचा मृत्यू

अमेरिकेत टेक्सास राज्यात आलेल्या भीषण पुरामुळे आतापर्यंत किमान ४९ जणांचा मृत्यू झाला असल्याचं वृत्त आहे. मृतांमध्ये १५ लहान मुलांचा समावेश असून, एका खासगी युवा शिबिरातून २७ मुलं बेपत्ता असल्याची माहिती तिथल्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. पुराच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. आतापर्यंत सुमारे ८५० लोकांना वाचवण्यात यश आलं असल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं. दरम्यान, या भागात आणखी पाऊस पडून पुन्हा पूर येण्याची शक्यता तिथल्या हवामान विभागानं व्यक्त केली आहे. दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी या भीषण पुरामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल, विशेषतः लहान मुलांच्या मृत्यूबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. आपल्या संवेदना अमेरिकेचं सरकार आणि दु:खग्रस्त कुटुंबियांसोबत असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.