अफगाणिस्तानमध्ये पाकिस्ताननं केलेल्या हवाई हल्ल्यात किमान १५ जणांचा मृत्यु

अफगाणिस्तानमध्ये, पक्तिका प्रांतातल्या बरमल जिल्ह्यावर काल रात्री पाकिस्ताननं केलेल्या हवाई हल्ल्यात किमान १५ जण मृत्युमुखी पडले. तालिबान या दहशतवादी संघटनेवर लक्ष्य साधत अफगाणिस्तान बरोबरच्या आपल्या सीमे लगतच्या डोंगराळ भागात पाकिस्ताननं हा हल्ला केल्याचं स्थानिक वृत्त संस्थेनं म्हटलं आहे. पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी मात्र या वृत्ताला अधिकृतपणे स्वीकृती दिली नाही. अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानी अतिरेक्यांची उपस्थिती वाढत असून, दोन्ही देशांमधल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाला.