December 14, 2025 2:21 PM | stars

printer

खगोलप्रेमींना रात्री आकाशात उल्कावर्षावाचं अद्भुत दृष्य  पाहायला मिळणार

खगोलप्रेमींना आज रात्री आकाशात उल्कावर्षावाचं अद्भुत दृष्य  पाहायला मिळणार आहे. हा या वर्षातला सर्वात मोठा उल्कावर्षाव असून, रात्री सुमारे ९ वाजल्यापासून पहाटेपर्यंत दर तासाला १०० हून अधिक उल्का पडताना दिसू शकतात. हा उल्कावर्षाव मिथुन या तारकासमूहात होणार असल्यानं त्याला मिथुन उल्कावर्षाव असं नाव देण्यात आलं आहे.  शहरातल्या कृत्रिम उजेडापासून दूर अंधारलेल्या निरभ्र आकाशात वायव्य दिशेला हा उल्कावर्षाव साध्या डोळ्यांनी पाहता येईल.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.