यशस्वी अंतराळ मोहिमेनंतर भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला उद्या भारतात परतणार आहेत. भारतात परतल्यानंतर आपल्या मूळ गावी लखनौला जाण्यापूर्वी ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना भेटणार आहेत. जून महिन्यात ॲक्झिओम ४ मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचणारे शुक्ला हे पहिले भारतीय बनले.
१८ दिवसांच्या मोहिमेनंतर १५ जुलै रोजी ते पृथ्वीवर परतले.