आचारसंहिता काळात आतापर्यंत ५०२ कोटी ६३ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

विधानसभा निवडणूक आचारसंहिता काळात राज्यभरात सी-व्हिजिल ॲपवर एकूण पाच हजार २८६ तक्रारी प्राप्त झाल्या, त्यापैकी पाच हजार २३० तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. याच काळात विविध अंमलबजावणी यंत्रणांनी केलेल्या कारवाईत बेकायदा रोकड, मद्यासह इतर अंमली पदार्थ आणि मौल्यवान धातू असा सुमारे ५०२ कोटी ६३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलं आहे.