डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 21, 2024 1:20 PM | J&K election

printer

जम्मू आणि काश्मिरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानासाठी प्रचाराला वेग

जम्मू आणि काश्मिरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानासाठी प्रचारानं वेग घेतला आहे. या टप्प्यात येत्या २५ तारखेला ६ जिल्ह्यांमधल्या २६ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुंछ, राजौरी आणि जम्मू इथं ५ प्रचारसभांना संबोधित करणार असून उद्या उधमपूर इथं माजलता आणि नौशेरा इथं त्यांच्या प्रचारसभा होणार आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याही  प्रचारसभा उद्या होणार आहेत. 

काँग्रेस नेते राहुल गांधी तसंच नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि जम्मू काश्मिरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्या सभा सोमवारी होणार आहेत.