डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 29, 2024 5:13 PM | Assembly Elections

printer

विधानसभा निवडणुकीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची १२ जागांची मागणी

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतले तीन प्रमुख पक्ष इतर समविचारी पक्षांचा विचार न करता आपसातच जागावाटपाची चर्चा करत असल्याची नाराजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं व्यक्त केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी माकपनं केवळ १२ जागांची मागणी केला आहे. इतर पक्षांनीही मर्यादित जागांची मागणी केली आहे. पण त्यांना जागावाटपाच्या प्रक्रियेत अद्याप सामावून घेतलेलं नाही. महाविकास आघाडीच्या अंतर्गत एकजुटीसाठी हे घातक आहे, असं माकपच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटलं आहे.