नौदलाच्या जवानाची दिशाभूल करुन त्यांची बंदूक आणि काडतूस पळवून नेल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन भावांना अटक केली आहे. तेलंगाणातल्या असिफाबादमधून ही अटक करण्यात आली.
दोघांपैकी एक जण अग्नीवीर आहे. शनिवारी रात्री दोघांपैकी एकानं कर्तव्यावर असणाऱ्या जवानाची दिशाभूल करुन त्याची बंदूक आणि काडतूस घेतली होती. या दोघांना मुंबईत आणलं जातंय.