बहरीनमधील मनामा इथं सुरू असलेल्या तिसऱ्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धामध्ये काल सहा भारतीय मुष्टियुद्धपटूंनी आपापल्या स्पर्धांच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पुरुषांच्या उपांत्य फेरीत भारताच्या अनंत देशमुखनंही काल कास्यपदक पटकावलं. मुलींच्या उपांत्य फेरीत, 46 किलो गटात खुशी चंदनं मंगोलियावर 5-0 असा विजय मिळवला तर 66 किलो गटात हरनूर कौरने चिनी तैपेईचा 5-0 असा पराभव केला. दुसऱ्या सत्रात, 50 किलो गटात अहानानं उझबेकिस्तानचा 3-2 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. मुलांच्या गटात, 50 किलो गटात लांचेनबा सिंग मोईबुंग खोंग बाम नं कोरियावर 5-0 असा विजय मिळवत अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं. दरम्यान, या स्पर्धामध्ये भारताने आतापर्यंत सर्व खेळांमध्ये 27 पदके जिंकली आहेत, ज्यात चार सुवर्ण, दहा रौप्य आणि तेरा कास्यपदके असुन पदकतालिकेत भारत नवव्या स्थानावर आहे.
Site Admin | October 29, 2025 10:06 AM | Asian Youth Games 2025
आशियाई युवा क्रीडा स्पर्धामध्ये पदकतालिकेत भारत ९व्या स्थानी