डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

भारतीय कबड्डी संघानं पटकावलं सुवर्ण पदक

बहारीनमध्ये सुरू असलेल्या आशियायी युवा स्पर्धांमध्ये १८ वर्षांखालील मुलं आणि मुलींच्या भारतीय कबड्डी संघानं सुवर्ण पदक पटकावलं आहे. मुलींच्या संघानं इराणला ७५-२१ असं १२ वर्षातल्या सर्वात मोठ्या फरकानं नमवलं. मुलांच्या संघानं इराणला ३५-३२ असं हरवलं. 

या स्पर्धेत मुलींच्या १०० मीटर अडथळ्यांच्या धावण्याच्या स्पर्धेत ठाण्याची शौर्या अंबुरे हिला रजत पदक मिळालं.