बहरीनमधे मनामा इथं काल झालेल्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये कुरश या पारंपरिक कुस्ती प्रकारात भारतानं आणखी दोन पदकं जिंकली. त्यामुळं या स्पर्धेत पदकांची एकंदर संख्या ३ झाली आहे. महिलांच्या ५२ किलो गटात, कनिष्का बिधुरीला अंतिम फेरीत उझबेकिस्तानच्या मुबीनाबोनू करिमोवाकडून ३-० असा पराभव पत्करावा लागल्यानं तिला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. पुरुषांच्या ८३ किलो गटात अरविंदने कांस्यपदक पटकावलं.
Site Admin | October 21, 2025 12:58 PM | Asian Youth Games 2025
Asian Youth Games 2025 : ‘कुरश’ कुस्ती प्रकारात भारताला दोन पदकं
