आशियाई टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महिला दुहेरी प्रकारात ऐहिका मुखर्जी आणि सुतीर्था मुखर्जी या जोडीने पटकावलं कास्यपदक

कझाकस्तानमध्ये अस्ताना इथं सुरु असलेल्या आशियाई टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महिला दुहेरी प्रकारात भारताच्या ऐहिका मुखर्जी आणि सुतीर्था मुखर्जी या जोडीनं इतिहास रचत कास्यपदक पटकावलं आहे. आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत महिला दुहेरीमध्ये पदक मिळवणारी ऐहिका आणि सुतीर्था ही पहिलीच भारतीय जोडी आहे. उपांत्य फेरीच्या आज झालेल्या सामन्यात जपानच्या मिवा हरिमोटो आणि मियुउ किहाराया या जोडीनं भारतीय जोडीचा पराभव केला. त्यामुळे भारताला कास्यपदकावर समाधान मानावं लागलं.