आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारताच्या रश्मिका सहगलला सुवर्णपदक

१६ व्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारताच्या रश्मिका सहगलने कझाकस्तानमधील श्यामकेंट इथं झालेल्या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी सुवर्णपदक जिंकलं आहे. भारताला मिळालेलं हे तिसरं वैयक्तिक सुवर्णपदक आहे. रश्मिकाने 241 पूर्णांक 9 गुणांसह कनिष्ठ महिला एअर पिस्तूल मुकुट जिंकला. दुहेरी ऑलिंपिक कांस्यपदक विजेती मनु भाकरनं महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल अंतिम फेरीत तिसरे स्थान पटकावलं असून रश्मिकानं वंशिका चौधरी आणि मोहिनी सिंग यांच्यासोबत या स्पर्धेत सांघिक सुवर्णपदक जिंकलं आहे. आतापर्यंत झालेल्या सर्व स्पर्धांमध्ये भारताने पाच सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्यपदके जिंकली आहेत.