व्हिएतनाम इथं झालेल्या आशियाई रोईंग म्हणजे नौका वल्हवण्याच्या अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं १० पदकांची कमाई केली. यात ३ सुवर्ण, ५ रौप्य आणि दोन कांस्यपदकांचा समावेश आहे. पुरुष गटात दुहेरी स्कल, चौघांच्या स्कल आणि एकेरी स्कल या प्रकारात भारताच्या खेळाडूंनी सुवर्णपदकं पटकावली.
Site Admin | October 20, 2025 1:32 PM | Asian Rowing Championships
आशियाई रोईंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताला १० पदकांची कमाई
