आशियाई अजिंक्यपद मुष्टीयुध्द स्पर्धेत भारताला २७ पदकं

बँकॉकमध्ये सुरु असलेल्या 19 वर्षांखालील आणि 22 वर्षांखालील आशियाई अजिंक्यपद मुष्टीयुध्द स्पर्धेत 80 किलो वजनी गटात महिलांच्या स्पर्धेत रितीकानं काल सुवर्णपदक पटकावलं. या विजयासह भारतानं या स्पर्धेत 27 पदकांची कमाई केली आहे. 19 वर्षांखालील गटात 3 सुवर्ण, 7 रौप्य आणि 4 कास्य पदके तर 22 वर्षांखालील गटात 1 सुवर्ण, 4 रौप्य आणि 8 कास्य पदकांचा समावेश आहे.