आशियाई मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताची चमकदार कामगिरी

19 वर्षांखालील आशियाई मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पाच पुरुष मुष्टीयोद्ध्यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेत भारताची 12 पदकं यामुळे निश्चित झाली आहेत. 7 महिला मुष्टीयोद्ध्यांनी याआधीच उपांत्य फेरीत स्थान मिळवलं आहे. दरम्यान, 22 वर्षांखालील गटाच्या आशियाई मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धाही सुरू आहेत. या स्पर्धेतही भारताला 13 पदकं मिळणं निश्चित आहे. या स्पर्धेत 5 मुष्टीयोद्ध्यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.