ढाका इथं आयोजित आशियाई तिरंदाजी स्पर्धेत भारतानं आज रिकर्व्ह प्रकारात दोन वैयक्तिक आणि एक सांघिक सुवर्णपदक जिंकलं आहे. महिलांच्या गटामध्ये रिकर्व्ह प्रकारात अंकिता भकत हिने कोरियाच्या सुह्योन नाम हिच्यावर ७-३ असा विजय मिळवत सुवर्णपदक जिंकल. तर पुरुषांच्या गटात रिकर्व्ह प्रकारात धीरज बोम्मदेवराने भारताच्याच राहुल याला ६-२ने पराभूत करत सुवर्णपदक जिंकलं. या विजयानंतर राहुल हा रौप्य पदकाचा मानकरी ठरला आहे. रिकर्व्ह प्रकाराच्या पुरुषांच्या सांघिक स्पर्धेत यशदीप भोगे, अतानु दास आणि राहुल यांच्या संघाने कोरियाच्या संघावर ५-४ असा विजय मिळवून सांघिक सुवर्णपदकाची कमाई केली.
Site Admin | November 14, 2025 8:58 PM | Asian Archery Championships
आशियाई तिरंदाजी स्पर्धेत भारताची ऐतिहासिक दिवसाची नोंद