डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

Archery Championships: भारताच्या अभिषेक वर्मा आणि दीपशिखा अंतिम फेरीत

ढाका इथे झालेल्या आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत कंपाउंड मिश्र प्रकारात भारताच्या अभिषेक वर्मा आणि दीपशिखा यांनी कझाकस्तानचा १५६-१५३ असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.  सुवर्ण पदकासाठी उद्या भारताचा सामना बांगलादेशशी होईल. रिकर्व्ह प्रकाराच्या सांघिक स्पर्धेत अंशिका कुमारी आणि यशदीप भोगे परवा कोरियाविरुद्ध कांस्य पदकासाठी लढत देतील.