आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताला दोन सुवर्ण, एक रौप्य पदक

ढाका इथं झालेल्या आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताने आज दोन सुवर्ण आणि एका रौप्य पदकाची कमाई केली. महिलांच्या कंपाऊंड सांघिक प्रकारात ज्योती सुरेखा वेण्णम, प्रितिका प्रदीप आणि दीपशिखा यांच्या संघानं कोरियाचा २३६ – २३४ असा पराभव करत सुवर्ण पदक पटकावलं. तर मिश्र सांघिक प्रकारात अभिषेक वर्मा आणि दीपशिखा यांनी बांग्लादेशचा १५३ – १५१ असा पराभव करत विजेतेपद पटकावलं. पुरुषांच्या कंपाऊंड सांघिक प्रकारात अभिषेक वर्मा, साहिल जाधव आणि प्रथमेश फुगे यांच्या संघाचा अंतिम फेरीत कझाकिस्तानच्या संघाकडून पराभव झाल्यानं त्यांना रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.