पुण्यात ९व्या फ्लॅगशिप एशिया इकॉनॉमिक डायलॉगला २० फेब्रुवारीपासून सुरुवात

९व्या फ्लॅगशिप एशिया इकॉनॉमिक डायलॉगला २० फेब्रुवारी पासून पुण्यात सुरुवात होणार आहे. यात कृत्रिम बुद्धीमत्ता आणि ऑटोमेशन तसंच वातावरण बदलाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम या विषयावर सखोल चर्चा होणार आहे. या कार्यक्रमात भारत आणि जगभरातले राजकीय नेते, वरिष्ठ सनदी अधिकारी, धोरण कर्ते, उद्योग तज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ सहभागी होणार आहेत, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं आहे.  २० ते २२ फेब्रुवारी दरम्यान हा कार्यक्रम होणार आहे. फ्रॅगमेंटशन युगातली आर्थिक लवचिकता आणि पुरुत्थान ही यंदाच्या कार्यक्रमाची संकल्पना आहे. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.