आशिया चषक टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. या संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव असेल. शुभमन गिल याच्याकडे उपकर्णधार पदाची धुरा असेल. या संघात अभिषेक शर्मा, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षित राणा, रिंकू सिंग यांचा समावेश आहे.
आशिया चषक स्पर्धा येत्या ९ ते २८ सप्टेंबर दरम्यान अबुधाबी आणि दुबई इथं होईल. भारताचा पहिला सामना १० सप्टेंबरला संयुक्त अरब अमिरातीबरोबर होईल. तर, १४ सप्टेंबरला पाकिस्तानशी सामना होईल.