आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज ब गटात, अबुधाबी इथं श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्यात सामना होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री आठ वाजता हा सामना सुरू होईल.
दरम्यान, काल अ गटात पाकिस्तान आणि ओमान यांच्यात झालेला सामना पाकिस्ताननं ९३ धावांनी जिंकला. या सामन्यात नाणेफेक जिंकल्यावर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्ताननं निर्धारीत २० षटकांत ७ बाद १६० धावा केल्या. मोहम्मद हॅरीस यानं पाकिस्तानच्या वतीनं सर्वाधिक ६६ धावांची खेळी केली.
त्यानंतर विजयासाठी १६१ धावांचा पाठलाग करताना ओमानचा संपूर्ण संघ १६ षटकं आणि ४ चेंडुंमध्ये केवळ ६७ धावांमध्येच तंबूत परतला.