डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 11, 2025 1:34 PM | Asia Cup 2025 | Cricket

printer

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताची विजयी सलामी

दुबई इथं सुरू असलेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत, अ गटात भारताने काल संयुक्त अरब अमिरातीच्या संघावर ९ गडी राखून विजय मिळवला. युएईच्या संघानं ५८ धावाचं लक्ष्य भारतापुढे ठेवलं होतं, ते केवळ ४ षटकं आणि तीन चेंडूत पूर्ण करताना केवळ एक गडी गमावला.

 

अभिषेक वर्मानं १६ चेंडूत ३० धावा केल्या तर त्याला शुभमन गिलनं २० धावा करत साथ दिली. तत्पुर्वी भारतानं युएईला १३ षटकं १ चेंडूत ५७ धावांवर बाद केले.

 

आजचा सामना बांगला देश आणि हाँगकाँग यांच्यात, अबुधाबी इथं होणार आहे.