January 2, 2026 3:28 PM | ashwin vaishnav

printer

महाराष्ट्रासह ८ राज्यात सेमीकंडक्टर प्रकल्पाचे २२ प्रस्ताव मंजूर

इलेक्ट्रॉनिक्स भाग उत्पादन योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात केंद्र सरकारने  २२ नवीन प्रस्ताव  मंजूर केले असून नवीन वर्षात देशामध्ये ४ नवे सेमिकंडक्टर उत्पादन प्रकल्प सुरु होत असल्याची घोषणा इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज केली. यासंबंधात नवी दिल्लीत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात आज ते बोलत होते.  याच्या आधीही सरकारने २४ प्रकल्पांना मंजुरी दिली होती.

 

या प्रकल्पांमध्ये ४१ हजार ८६३ कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून मोबाईल उत्पादन, दूरसंचार, ग्राहकोपयोगी आणि लष्करी उपयोगाचं इलेक्ट्रॉनिक्स, तसंच माहिती तंत्रज्ञान संबंधित यंत्रसामुग्री उत्पादनाचा यात समावेश आहे. हे प्रकल्प महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, कर्नाटक, हरयाणा, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये सुरु होणार असून यामधून सुमारे ३४ हजार रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे.