पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या कृत्रिम बुद्धीमत्ता प्रभाव शिखर परिषदेचं आयोजन भारत करणार आहे. केंद्रिय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल संसदेत ही माहिती दिली.
आरोग्य, शिक्षण, कृषी, हवामान बदल आणि प्रशासन यासारख्या वास्तव जगातल्या समस्यांचा सामना करण्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर या संकल्पनेवर परिषदेत भर देण्यात येईल असं त्यांनी सांगितलं.
कृत्रिम बुद्धीमत्तेशी संबंधित पायाभूत सुविधांचा विस्तार करण्याचं काम सरकार करत आहे. यामध्ये ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिटच्या वापरात वाढ आणि एआयकोष डेटासेटस मंचाची क्षमता वाढवणे यांचा समावेश असल्याचं ते म्हणाले.