केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी देशातील पहिली स्वदेशी सेमीकंडक्टर चिप या वर्षी तयार केली जाईल असं काल जाहीर केलं. हैदराबाद इथं केशव मेमोरियल एज्युकेशनल सोसायटीच्या 85 व्या स्थापना दिन समारंभात ते बोलत होते.
ते म्हणाले की, सरकारन सहा सेमीकंडक्टर प्लांटना यापूर्वीच मान्यता दिली आहे आणि त्यांचं बांधकाम सुरू आहे. इंडिया एआय मोहिमेचा भाग म्हणून, मोफत डाटासेट आणि इतर साधनं अपलोड केली जात आहेत. विकसित देशांतील विद्यार्थी शैक्षणिक संधींसाठी भारतात येतील तो दिवस दूर नाही असा विश्वास वैष्णव यांनी व्यक्त केला.