जम्मू-काश्मीरमध्ये बडगामपासून ते दिल्लीतल्या आदर्श नगर स्थानकापर्यंत पार्सल वाहून नेणारी एक विशेष रेल्वे गाडी सुरू करण्यात येत असल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.
या रेल्वेतून फळे आणि हस्तकला विक्रेत्यांना त्यांची उत्पादनं देशभरात पोहोचवता येतील, असं वैष्णव आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हणाले आहेत.