इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं आज इलेक्ट्रॉनिक घटक उत्पादन योजनेअंतर्गत ७ अर्जांच्या पहिल्या टप्प्याला मंजुरी दिली, अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत प्रसार माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. या अर्जांमध्ये एकूण ५ हजार ५३२ कोटी रुपयांची गुंतवणूक आणि ४४ हजार ४०६ कोटी रुपयांचे उत्पादन अपेक्षित आहे. या उपक्रमातून ५ हजारांहून अधिक थेट रोजगार निर्माण होतील, अशी अपेक्षा असल्याचं त्यांनी सांगितलं. मंजुरी मिळालेल्या प्रकल्पामध्ये बहू स्तरीय प्रिंटेड सर्किट बोर्ड, लॅमिनेट, पॉलीप्रोपेलिन फिल्म्स यासारख्या उद्योगांचा समावेश आहे. हे प्रकल्प तामीळनाडू, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश या राज्यात उभारले जाणार आहेत.
Site Admin | October 27, 2025 7:23 PM
इलेक्ट्रॉनिक घटक उत्पादन योजनेअंतर्गत ७ अर्जांच्या पहिल्या टप्प्याला मंजुरी