देशातील दहा लाख नागरिकांना एआय अर्थात कृत्रिम बुद्धीमत्तेचं प्रशिक्षण विनाशुल्क देण्याची घोषणा केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली. ते नवी दिल्ली इथं ‘सामान्य सेवा दिवस – डिजिटल भारताची दहा वर्षे’ या कार्यक्रमात बोलत होते. या प्रशिक्षणासाठी ग्रामीण स्तरावरच्या उद्योजकांना प्राधान्य देण्यात येईल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
युपीआय पेमेंटची संख्या व्हिसाच्या पेमेंटहून जास्त झाल्याचं सांगत डिजिटल भारत ही संकल्पना आणि त्याचे लाभ घराघरापर्यंत पोचवण्यासाठी सामान्य सेवा क्रेंद्रातील कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या कष्टांचा त्यांनी गौरव केला. आयआरसीटीसी सेवा नागरिकांपर्यत पोचवण्यासाठी पुढे येण्याचं आवाहन वैष्णव यांनी यावेळी ग्रामीण उद्योजकांना केलं