January 2, 2026 3:17 PM

printer

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठीच्या महाराष्ट्रातल्या दुसऱ्या बोगद्याचा  ब्रेकथ्रू संपन्न

मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन च्या माध्यमातून मध्यमवर्गीयांना  परवडणाऱ्या दरात प्रवास करण्याची सुविधा मिळेल असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. बुलेट ट्रेनसाठीच्या महाराष्ट्रातल्या दुसऱ्या बोगद्याच्या पालघर जिल्ह्यातल्या  ब्रेकथ्रू समारंभाला ते आज दूरस्थ पद्धतीने उपस्थित होते.

 

हा  दीड किलोमीटर लांबीचा बोगदा विरार ते बोईसर स्थानकांदरम्यान खोदला आहे. महाराष्ट्रातला पहिला बोगदा ठाणे ते बीकेसी दरम्यान असून तो ५ किलोमीटर लांबीचा आहे. या बोगद्याचं खोदकाम सप्टेंबर २०२५ मध्ये पूर्ण झालं होत. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प ५०८ किलोमीटर लांबीचा असून बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा १५ ऑगस्ट २०२७ रोजी सेवेत रुजू होईल असं ते म्हणाले.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.