सेवा आणि सुशासन या तत्वांचं अनुसरण करीत केंद्र सरकारने गेल्या ११ वर्षांत देशाच्या सर्वांगीण प्रगतीचा आलेख उंचावला आहे. या प्रगतीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा सिंहाचा वाटा आहे. मोदी यांचा जागतिक पातळीवरचं प्रभावशाली व्यक्तिमत्व बनण्याचा प्रवास असाधारण आहे. विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी त्यांच्या नेतृत्वाविषयी गौरवोद्गार काढले आहेत.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रधानमंत्री मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदान केलं. याच निमित्ताने नवी दिल्ली इथे एका कार्यक्रमात सेवा पर्वावर दूरदर्शनसाठी कार्यक्रमांची एक विशेष मालिका सुरू केल्याची माहिती वैष्णव यांनी दिली.