डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

केंद्रीय रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते हडपसर जोधपुर एक्सप्रेसचं उद्घाटन

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते आज हडपसर जोधपुर एक्सप्रेस आणि एमजीआर चेन्नई सेंट्रल – भगत की कोठी एक्सप्रेसचं  उद्घाटन हिरवा झेंडा दाखवून करण्यात आलं. यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, गजेंद्र सिंह शेखावत, खासदार मेधा कुलकर्णी, श्रीरंग बारणे मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. तर केंद्रीय मंत्री एल मुरुगन दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.

 

तत्पूर्वी अश्विनी वैष्णव यांनी आज मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलातल्या प्रस्तावित बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या जागेला भेट देऊन पाहणी केली. त्यांनी अभियंते आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या प्रकल्पामुळे देशात रेल्वे सुविधांचा कायापालट होणार असून अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असं वैष्णव यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.