…तर पटोले यांच्या विरुद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार करू – आशिष शेलार

रश्मी शुक्ला यांच्या कार्यकाळाला मुदतवाढ देण्यावरून नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीसांवर बेछूट आरोप केले. मात्र, त्याचे पुरावे नसतील तर आज नाना पटोले यांच्या विरुद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार करू, अशी माहिती भाजपाचे आमदार आणि मुंबई शहर अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत दिली.